दिनांक: 20 जून, 2014
आयबीएन लोकमतवर आज शुक्रवार दिनांक 20 जून, 2014 ला आजचा सवाल होता
'केंद्र सरकारने 14.2% केलेली रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ?
या कार्यक्रमाला अँकर होत्या अलका. निखिल वागळे रजेवर होते. कार्यक्रमाच्या शेवटी जनमताचा कौल होता.
होय 77% नाही 23%
म्हणजे 77% लोक मोदी सरकारच्या बाजूने आहेत. लोकांना ही भाडेवाढ अपरिहार्य वाटली कारण काँग्रेसच्या (UPA-2) मागील 10 वर्षांच्या काळात एकदाही रेल्वेची भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे रेल्वे डबघाईला आली आहे.
आजच्या सवालला भाजपचे अतुल भातळकर, कम्युनीष्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, काँग्रेसचे भाई जगताप, पत्रकार सुरेश भटेवारा आणि रेल्वे असोसिएशनचे प्रतिनिधी असे लोक उपस्थित होते. कोण काय बोलले ते पहा.
अलका भातळकर यांना: तुमच्या सरकारने ही भाडेवाढ रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना संसदेत का नाही केली. मधेच अशी भाडेवाढ का?
भातळकर: रेल्वेला सध्या रोज 30 कोटी म्हणजे महिन्याला 900 कोटी रुपये तोटा होत होता. तसेच रेल्वेला ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला आहे. म्हणून ही वाढ आवश्यक होती.
अभ्यंकर: ही भाववाढ चुकीची आहे. या सरकारला व्हिजनच नाही. संसदेत चर्चा घडवून अणायाला पाहिजे होती.
भातळकर: रेल्वे ही पेशंट होउन ICU मधे होती म्हणून हे ऑपरेशन करणे आवश्यक होते.
भटेवारा: ही भाडेवाढ आवश्यक होती हे खरे आहे. रेल्वेच्या भाडेवाढीसाठी एक समिति आहे. ह्या समितीने फेब्रुवारी 2014 लाच मनमोहन सरकारला भाडेवाढ करायला सांगितले होते. परंतु त्यांनी ती पुढे ढकलली. 16 मे ला ते भाडेवाढ करणार होते परंतु ते म्हणाले की नविन सरकारच हा निर्णय घेईल. तरीही नवीन सरकारने संसदेच्या अधिवेशनात ही बाब मांडायाला हवी होती. एव्हडी घाई नको होती.
भातळकर: पेशंट ICU मधे असल्यावर ऑपरेशन करणे कसे थांबवता येईल.
अभ्यंकर बोलत असताना भातळकर मधेच बोलले तर अलका त्यांना म्हणाली आता तुमचे सरकार आले आहे तर त्यांना बोलू द्या ना ! आयबीएन लोकमतवर भाजपच्या लोकांना असेच गप्प बसवले जाते.
मला एकाचेच म्हणने पटले ते म्हणजे प्रवासी संघटनेचे प्रवक्ता यांचे. त्यांचे म्हणने होते की भाववाढ आवश्यक होती, पण ती थोडीथोडी आणि टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती.
या भाववाढीविषयी बऱ्याच जणांनी 'हेच मोदी सरकारचे आच्छे दिन आहेत काय ? अशी टर उडवली. एका महिन्याच्या आत मोदिंनी लोकांना महगाईच्या खाईत लोटले असे बाहेरही मुले बोलत होती.
खरे पाहिले तर मुंबईकरांसाठी ही भाडेवाढ फक्त १४.२% नसून १००% ते १५०% आहे. कारण दरवाढी बरोबरच रेल्वेने मासिक पासात अशी वाढ केली आहे की पासाची किंमत दुपटीने वाढली आहे. आणि हे फक्त मुंबईकरांसाठीच आहे. कारण रेल्वेला मुंबईच्या लोकल गाड्यांतुनच सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि सुविधा काही नाहीत. चेंगराचेंगरीतच प्रवास करावा लागतो. इतर राज्यातील बरेचसे प्रवासी फ़ुकटे असतात.
यापूर्वी मासिक पासासाठी १५ एकेरी प्रवासाच्या तिकिटाचे दर एकत्रीत करुण मासिक पासाची किंमत काढायचे ते आता ३० एकेरी प्रवासाच्या तिकिटाचे दर एकत्रित करुण मासिक पास देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरी लोकल पासाचे दर एकदम दुप्पट ते अडीचपट झाले. हे मुंबईच्या लोकांसाठी अन्यायकारक दरवाढ आहे. यामुळेच बरेचसे लोक चिडले आहेत. आंदोलने, रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या आंदोलन असे बरेच काही चालले आहे.
सुरुवातीलाच भाववाढ करायची आणि निवडणुका आल्यावर करायची नाही हे काँग्रेसचे राजकारण मोदी सरकारने करू नये एवढिच मोदींकडून अपेक्षा.
या बाबत आनंदाची बातमी आली आहे, ती नंतर सांगतो.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा