शुक्रवार, २७ जून, २०१४

रेल्वेची 14.2% भाडेवाढ- मोदी सरकार चा पहिला झटका

दिनांक: 20 जून, 2014

आयबीएन लोकमतवर आज शुक्रवार दिनांक 20 जून, 2014 ला आजचा सवाल होता

'केंद्र सरकारने 14.2% केलेली रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ?

या कार्यक्रमाला अँकर होत्या अलका. निखिल वागळे रजेवर होते. कार्यक्रमाच्या शेवटी जनमताचा कौल होता.

होय 77%        नाही 23%

म्हणजे 77% लोक मोदी सरकारच्या बाजूने आहेत. लोकांना ही भाडेवाढ अपरिहार्य वाटली कारण काँग्रेसच्या (UPA-2) मागील 10 वर्षांच्या काळात एकदाही रेल्वेची भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे रेल्वे डबघाईला आली आहे.

आजच्या सवालला भाजपचे अतुल भातळकर, कम्युनीष्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, काँग्रेसचे भाई जगताप, पत्रकार सुरेश भटेवारा आणि रेल्वे असोसिएशनचे प्रतिनिधी असे लोक उपस्थित होते. कोण काय बोलले ते पहा.

अलका भातळकर यांना: तुमच्या सरकारने ही भाडेवाढ रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना संसदेत का नाही केली. मधेच अशी भाडेवाढ का?

भातळकर: रेल्वेला सध्या रोज 30 कोटी म्हणजे महिन्याला 900 कोटी रुपये तोटा होत होता. तसेच रेल्वेला ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला आहे. म्हणून ही वाढ आवश्यक होती.

अभ्यंकर: ही भाववाढ चुकीची आहे. या सरकारला व्हिजनच नाही. संसदेत चर्चा घडवून अणायाला पाहिजे होती.

भातळकर: रेल्वे ही पेशंट होउन ICU मधे होती म्हणून हे ऑपरेशन करणे आवश्यक होते.

भटेवारा: ही भाडेवाढ आवश्यक होती हे खरे आहे. रेल्वेच्या भाडेवाढीसाठी एक समिति आहे. ह्या समितीने फेब्रुवारी 2014 लाच मनमोहन सरकारला भाडेवाढ करायला सांगितले होते. परंतु त्यांनी ती पुढे ढकलली. 16 मे ला ते भाडेवाढ करणार होते परंतु ते म्हणाले की नविन सरकारच हा निर्णय घेईल. तरीही नवीन सरकारने संसदेच्या अधिवेशनात ही बाब मांडायाला हवी होती. एव्हडी घाई नको होती.

भातळकर: पेशंट ICU मधे असल्यावर ऑपरेशन करणे कसे थांबवता येईल.

अभ्यंकर बोलत असताना भातळकर मधेच बोलले तर अलका त्यांना म्हणाली आता तुमचे सरकार आले आहे तर त्यांना बोलू द्या ना ! आयबीएन लोकमतवर भाजपच्या लोकांना असेच गप्प बसवले जाते.

मला एकाचेच म्हणने पटले ते म्हणजे प्रवासी संघटनेचे प्रवक्ता यांचे. त्यांचे म्हणने होते की भाववाढ आवश्यक होती, पण ती थोडीथोडी आणि टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती.

या भाववाढीविषयी बऱ्याच जणांनी 'हेच मोदी सरकारचे आच्छे दिन आहेत काय ? अशी टर उडवली. एका महिन्याच्या आत मोदिंनी लोकांना महगाईच्या खाईत लोटले असे बाहेरही मुले बोलत होती.


खरे पाहिले तर मुंबईकरांसाठी ही भाडेवाढ फक्त १४.२% नसून १००% ते १५०% आहे. कारण दरवाढी बरोबरच रेल्वेने मासिक पासात अशी वाढ केली आहे की पासाची किंमत दुपटीने वाढली आहे. आणि हे फक्त मुंबईकरांसाठीच आहे. कारण रेल्वेला मुंबईच्या लोकल गाड्यांतुनच सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि सुविधा काही नाहीत. चेंगराचेंगरीतच प्रवास करावा लागतो. इतर राज्यातील बरेचसे प्रवासी फ़ुकटे असतात.
यापूर्वी मासिक पासासाठी १५  एकेरी प्रवासाच्या  तिकिटाचे दर एकत्रीत करुण मासिक पासाची किंमत काढायचे ते आता ३० एकेरी प्रवासाच्या तिकिटाचे दर एकत्रित करुण मासिक पास देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरी लोकल पासाचे दर एकदम दुप्पट ते अडीचपट झाले. हे मुंबईच्या लोकांसाठी अन्यायकारक दरवाढ आहे. यामुळेच बरेचसे लोक चिडले आहेत. आंदोलने, रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या आंदोलन असे बरेच काही चालले आहे.

सुरुवातीलाच भाववाढ करायची आणि निवडणुका आल्यावर करायची नाही हे काँग्रेसचे राजकारण मोदी सरकारने करू नये एवढिच मोदींकडून अपेक्षा.

या बाबत आनंदाची बातमी आली आहे, ती नंतर सांगतो.

सोमवार, १६ जून, २०१४

राज ठाकरे निवडणुक लढ़वणार


दिनांक: 1 जून, 2014

काल मुंबईच्या सोमय्या कॉलेज (शिव, सायन) मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेला दिडदोन लाखाची गर्दी होती. 'मला तुमच्याशी काही बोलायाचय' असे आवाहन करुण सभा भरवली होती. हरल्या नंतर इतक्या लवकर सभा घेणारा मी पहिलाच असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी खालील मुद्दे मांडले.

1. ही निवडणुक पूर्णत: मोदिंची होती. आणि जे कोणी महायुतुचे उमेदवार निवडून आले आहेत ते फक्त मोदींच्या नावामुळेच निवडून आले आहेत. पंतप्रधान झाल्याबद्दल आणि पूर्ण बहुमत मिळवल्याबद्दल त्यांनी मोदिंचे अभिनंदन केले.

2. त्यांनी हेही सांगितले की महात्मा गांधींचा खरा अनुयायी कोण असेल तर राहुल गांधी. कारण गांधींनी सांगितले होते की कॉंग्रेस विसर्जित करा, ते फक्त राहुल गांधीनेच करुण दाखवले.



3. पत्रकार विचारतात की तुम्ही नाशिक मधे काही केले नाही म्हणून हरले. त्यांनी मग पत्रकाराला एक फाइल दाखवली ज्यात चालू असलेल्या कामांची जंत्री होती. पत्रकाराने विचारले तुम्हाला नाशिकला निवडून येउन किती वर्षे झाली. तेव्हा राज म्हणाले साधारण दोन वर्ष. पत्रकार म्हणतो फ़क्त दोन वर्ष ? बरेच काम होत आहे.  आणि तरीही तो पत्रकार  म्हणतो काय  करणार  आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत ना?

त्यांनी असेही सांगितले की नाशिक महापालिका त्यांच्याकडे आली तेव्हा पलिकेवर साडेसहाशे कोटींचे कर्ज होते. ऑक्ट्रोय  खाजगी कंपनीकडे होता. तो पालिकेने स्वत: जमवायला सुरुवात केली तर दोनशे कोटी उत्पन्न वाढले. इतर महापालिके मधे तीस तीस वर्षे सत्ता असुनही त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, मग मलाच का? हा शिवसेनेला टोला होता. नाशिक मधे कोणती कामे चालू आहेत त्याची फाइलच त्यांनी दाखवली. नाशिकच्या नगरसेवक, पदाधिकारी यांनाही त्यांनी झापले. मी तुम्हाला निवडून अणायाचे आणि तुमचा प्रवक्ताही व्हायचे काय? केलेल्या कामाची माहिती तुम्ही लोकांना द्यायला नको का असेही ते म्हणाले.

4. लोकसभेला मी उमेदवार उभे करणार नव्हतो. पण आमच्या पदाधिकारी आणि इतर यांच्या आग्रहामुळे मी उमेदवार उभे केले. त्यांनी मनसेला मत दिलेल्या मतदारांचेही आभार मानले. पराभव हा सत्ताधारी पक्षाचा होतो विरोधाकांचा नाही असे ते म्हणाले.

5. विधानसभेच्या निवडणुकीला तेही उभे राहतील असे त्यांनी जाहीर केले आणि आमच्या निवडून आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. राज ठाकारेंनी पराभवानंतर लगेच सभा घेतली हे एक वेगळेपण आहे. परंतु त्यांच्या भाषणात नेहमीचा जोश नव्हता. निवडूण आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असे ते म्हणाले परंतु मीच मुख्यमंत्री होईन हे बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यांनी केलेल्या भाषणात बरेचसे मुद्दे अर्धवट राहिले असे वाटले.

आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेसला निशाना बनवले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यावरही टिका केली. मला असे वाटतेकी शिवसेना आणि भाजप यांना टीकेचे लक्ष करणे चुकीचे आहे. कारण हे दोन्ही पक्ष विरोधी पक्ष आहेत. त्यांच्यावर टिका करुण काहिही फायदा होणार नहीं. कारण लोक सत्ताधारी पक्षाला कंटाळले आहेत. विरोधी पक्षांवर टिका करणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची बाजु घेणे.

सध्या  मोदिंची लाट आहे आणि ती चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत टिकेल हे नक्की. (महायुतिने आपआपसात भांडणे न केल्यास). सध्यातरी  मनसेने एकटे निवडणुक लढावणे पक्षाला घातक आहे. मागील तेरा आमदार राखनेही अवघड आहे.

म्हणून मनसेकडे तीन पर्याय उरतात. हे पर्याय फायद्या  प्रमाणे आहेत.

1. सरळ सरळ महायुतीत सामील होणे -शिवसेना विरोध करीलच यात काही शंका नाही. परंतु गडकरींच्या सांगण्यावरून राज ठाकारेंनी भाजप विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. (दोन अपवाद वगळता) त्यामुळे गडकरी युतिमधे मनसेला घेण्याविषयी दबाव आणु शकतील.

2. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती सोडून शेतकरी कामगार पक्ष, प्रकाश अंबेडकर यांचा पक्ष, असे छोटे मोठे पक्ष यांची मोट बांधणे

3. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी युती (aliance) करणे. - यूपी- बिहारी यांच्या विरोधातील आंदोलनामुळे पूर्वी कॉंग्रेस या युतीस कधीही तयार झाली नसती. परंतु आताची परिस्तिथि वेगळी आहे. यूपी-बिहार मधे कॉंग्रेसला काही बेसच राहिलेला नाही. मग डर कशाला. राष्ट्रवादीचा यूपी-बिहारशी काडीचाही संबंध नाही. आणि आपले पवार कधी कुठे जातील, कोणाशी युती-आघाडी करतील याचा काहीच नेम नसतो. राजची पवार साहेबांनी बऱ्याच वेळा प्रशंषा केली आहे. अजित पवारही राजविषयी कधीतरी चांगले बोलले आहेत.

हा तीसरा पर्याय मनसेला तारुही शकतो आणि मारुही.

रविवार, १५ जून, २०१४

मोदिंचा पंतप्रधान पदाचा शपथविधी


दि. 25 मे, 2014

आयबीएन लोकमत वर आजचा सवाल होता 'सार्क देशातील प्रमुखांना शपथ -विधिला बोलवून नरेन्द्र मोदिंनी नविन पायंडा पाडलाय काय?'. होय 96% नाही 4%. खरे म्हणजे असा प्रश्न विचारलाय की हो म्हणण्या शिवाय काही पर्यायच ठेवलेला नाही. कारण आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी सार्क देशातील पंतप्रधानांना शपथविधी समारंभाला बोलवलेले नाही. मग उत्तर होयच येइल ना ?

उत्तर जर हो आले तर वागळे खुश होतात. असं एकच उदहारण नाही तर असंख्य आहेत. ही वागले की दुनिया आहे, तर असो.

नमोंनी करझाई (अफगानिस्तान), नवाब शरीफ (पाकिस्तान), शेख हाशिना (बांग्लादेश), राजपक्षे (श्रीलंका), भुतान, मालदीव अणि नेपाळ यांच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधान या सर्वांना शपथविधी समारंभाला बोलाविले आहे.
या पैकी फक्त शरीफ अणि राजपक्षे यांना बोलवले म्हणून तंटा उदभवाला आहे. कांग्रेस म्हणते शरीफ यांना बोलवायला नको होते. भाजप पाकिस्तानच्या विरोधी एव्हड़े बोलतो मग शरिफला का आमंत्रण दिले. चर्चेमधे असेही कळले की लश्कर-ए-तैयब्बा ने शरिफना धमकी दिली आहे की भारतात शपथविधिला गेलात तर खबरदार ! जाणार असाल तर एकच तिकीट काढून जा. परत येण्याचे काढू नका. म्हणजे भारतातच रहा. कॉंग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले जर शरीफ स्वत: नाही आले अणि त्यांनी कोणा प्रतिनिधिला पाठविले तर भारताची संपूर्ण जगात नाचक्की होईल.
काय हे कांग्रेसचे प्रवक्ते. शरिफला नसते बोलाविले तरी बोंबाबोंब अणि बोलाविले तरी बोंबाबोंब. आता हे आशेच पाच वर्षे चालणार आहे.

दुसरे वादग्रस्त व्यक्ति म्हणजे राजपक्षे. त्यांना विरोध आहे जयललिता अणि करूणानिधि यांच्या पक्षांचा. राजपक्षे यांनी श्रीलंकेत तमिळि लोकांची कत्तल केली असे ते म्हणतात. नशीब चांगले की भाजपला बहुमत मिळाले. जरका सरकार बनवण्यासाठी कोणाचा आधार घ्यावा लागला असता तर काही खरे नव्हते.
(म्हणून मोदी आता सुपरमैन आहेत)

आजची आणखी नविन बातमी. भाजपने जसा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदींना आधीच जाहिर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आधी राजसाहेब यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहिर करावा. म्हणजे मनसेचे फुटलेले मतदार पुन्हा येतील. राजकारणात काहीही होऊ शकते याचा ढळढळित पुरवा उद्या.

बुधवार, २८ मे, २०१४

कांग्रेसच्या पराभवाला कारणीभूत दिवटे

दिनांक: 28 मे, 2014

दोन दिवसांपूर्वी भाऊ तोरासेकर यांनी त्यांचा ब्लॉग जागता पहारा वर 'दोन दिवट्याची गोष्ट' हा राहुल गांधी अणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अत्यंत सडेतोड लेख लिहला होता. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जाणवले की ही प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगवर टाकावी. भाऊ तोरसेकारान्नी या दोघांचा दिवटेपणा सप्रमाण सिद्ध केला आहे. तो लेख मुळातुन वाचण्या सारखा आहे. जिद्न्यासू वाचकांना तो लेख वरील लिंकवर वाचता येईल. त्या लेखावरील माझी प्रतिक्रिया.

भाऊ हे दोघेच नाहीत. असे अनेक दिवटे आहेत. ज्यांनी मोदींच्या विजयात खारीचा वाटा नाही तर हत्तिचा वाटा उचलला आहे.

दिवटा क्रमांक 3- नितीश कुमार- इतकी वर्षे भाजप बरोबर सत्ता भोगली. पण मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहिर केल्याबरोबर भाजपची साथ सोडून दिली. पण मुख्यमंत्री पद काही सोडले नाही. 

जे लोक निवडणुक पूर्व युती करतात ते हे विसरतात की आपल्या पक्षाला मिळालेली मते ही आपल्या एकट्याची नसून युतीतिल भागीदार पक्षाच्या मतदारांचीही आहेत. जर वेगवेगळे लढले तर मतांची टक्केवारी कमी होऊन दोन्हीही पक्ष हरु शकतात. 2010 च्या विधानसभेत जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला 112 जागा मिळाल्या अर्थात बहुमतापेक्षा फक्त 10 जागा कमी. म्हणून त्यांना वाटले की भाजपशी असलेली युती तोडली तरी 10 जागा इथून तिथून मिळवू अणि बहुमत सिद्ध करू. अणि ते मुख्यमंत्री पदाला चिटकून राहिले. अर्थात लोकांना हे पटले नसेलच. त्यात मोदिंनी बिहारच्या पुरग्रस्त लोकांसाठी पाठविलेली मदत परत केली. उपाशी पोटाला अन्न पाहिजे असते तेव्हा ते पोट हे पहात नाही की अन्न कोण देतय. बाकी कोणत्याही पक्षाबरोबर पटत नसल्यामुळे नितीश एकाकी लढले अणि स्वत:ची वाट लाऊन घेतली. भाजपने पासवानला बरोबर घेतले अणि सर्वांच्या चिंध्या करुण टाकल्या.

दिवटा क्रमांक 4 : मुलायम सिंग यादव - मुस्लिमांचे लान्गुलचालन करण्याची परिसीमा. त्यांची मजल तर इथपर्यन्त गेली की शक्तिमिल कंपाउंड मधे बलत्कार करणाऱ्या मुलांची बाजु घेतली. 'लडके है, गलती हो जाती है तो क्या फासी देंगे। हम ऐसा कानून बदल डालेंगे।' हे बोलण्याचे कारण त्या बलात्कार करणाऱ्या मुलांमधे दोन मुस्लिम तरुण आहेत. मुस्लिम मतांसाठी केलेले हे वक्तव्य. 

त्यात सोनिया गांधींनी घेतलेली इमामाची भेट. उत्तर प्रदेशातील बीचाऱ्या मुस्लीमान्ना कळेनासे झाले की कोणाला मत देऊ. मुस्लिमांची बाजु घेणाऱ्या मुलायामला की इमामाने फतवा काढलेल्या कांग्रेसला की सोसिअल इंजीनियरिंग करणाऱ्या मायावतिला. त्यामुळे झाले काय ही सगळी मुस्लीम मते विभागली गेली तिघात. त्या मधे भाजपचा झाला फायदा. कधी कधी असही वाटतं की मुस्लीम मतांचं जसं ध्रुवीकरण होतं तसं हिंदूंच्या मतांचं झाले असेल काय ? शंका आहे.

दिवटा क्रमांक 5- दिग्विजय सिंग- मुस्लीम लान्गुल चालनाचा महामेरु. जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी ओसमाला हे 'ओसामाजी' असे संबोधतात. तसेच अमेरिकेने ओसमाला सुमुद्रात फेकायचे नव्हते तर व्यवस्तीथ दफन करायला पाहिजे होते असे सांगतात. 

हेच दिग्विजय रामदेव बाबाला महाठग म्हणतात.

दिवटा क्रमांक 6- अजीत पवार-फक्त महाराष्ट्रा पुरता. अजीत पवारांनी धरनातील पाणी मिळवन्यासाठी उपोषण करत असलेल्या उपोषण कर्त्याला उद्देशून जहिररित्या असे सुनवले की ' धरनात पाणी नाहीतर मी त्यात आता  मुतू  कां ?' 

तसेच लोकसभेच्या निवडणुकी आधी अशी धमकी दिली की जे गाव माझ्या बहिणीला मतदान करणार नाही त्यांचे पाणी तोडू. या सगळ्या चा परिणाम म्हणजे आघाडीचे महाराष्ट्रात पानिपत.

आणखी बरेच दिवटे आहेत ज्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की नरेन्द्र मोदींवर हे लोक अन्याय करत आहेत. हिन्दू व मुस्लीम दंगे भारतात सगळीकड़े होतात व झाले आहेत. परन्तु 2002 च्या गुजरात दंगलीचे एव्हड़े अवडंबर माजविले की सांगता सोय नाही. त्यामधे मग माध्यमे , अनंतमुर्ती, अमेरिका (वीसा नाकारने) सोनियाचे 'मौतका सौदागर', 'नरेन्द्र मोदी पंतप्रधान होणं म्हणजे एक संकट' मनमोहन सिंग (Narendra Modi as PM will be disasterous), मणीशंकर अय्यर यांचे मोदींना 'चायवाला' म्हणून हिणवणे, विजय तेंडुलकर 'मला बंदूक मिळाली तर मी मोदींना गोळ्या घालेन.

बघा भाऊ एव्हडे दिवटे असल्यामुळे मोदींचा विजय आणखी सुकर झाला.

आपला नम्र,
रामदास पवार 

मंगळवार, २७ मे, २०१४

मोदींचा शपथविधी संपन्न



दिनांक: 26 मे, 2014

आज मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधि होता. सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एकून 45 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्राचे सहा मंत्री आहेत. नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, अनंत गीते (शिवसेना), रावसाहेब दानवे (जालनाचे खासदार)अणि पियूष गोयल (मुंबईचे आहेत असे वाटते). 
(महाराष्ट्रातील मंत्री)

शपथविधिला सार्क देशातील प्रमुख आले होते. त्यांत पाकिस्तानचे नवाब शरीफ, श्रीलंकेचे राजपक्षे, अफगानिस्तानचे हमीद करझाई, नेपाळचे कोइराला, भुतानचे अध्यक्ष, मालदीवचे अध्यक्ष अणि बांग्लादेशाचा प्रतिनिधि इत्यादि.
(सार्क देशाचे प्रमुख)

सोहळा चांगला झाला. सोहळ्याला चार हजार लोक उपस्थित होते. मंत्रीमंडळ सर्वसमावेशक आहे. मंत्रीमंडळात सात महिला आहेत. एकून मोदिंनी सुरुवात चांगली केली आहे. असे सर्वांचे मत होते. 

तरीही आजचा सवाल मधे कॉंग्रेसचे प्रवक्ते सतीश नाइक म्हणाले की भाजपने पडलेल्या उमेदवारांनाही मंत्री केले आहे. त्यांचा इशारा अरुण जेटली आणि स्मृती इराणी या दोघांकडे होता. तसेच व्ही. के. मालिक हे लष्कर प्रमुख होते. अणि त्यांना मंत्री बनवायला नको होते. 
(मोदिंची टीम)


हे कॉंग्रेसवाले जरा सटकलेत असं वाटतय. या प्रलापाला अविनाश धर्माधिकारी यांनी उत्तम उत्तर दिले. त्यांनी सांगितले की कोणतीही निवडनुक न लढताही मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान होते. (तेही कॉंग्रेसचे). एखादा मनुष्य निवडनुकित हरला तरी त्याच्या अनुभव व हुशारीचा फायदा घेऊन त्याला मंत्री बनवने चुकीचे नाही. तसेच सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माणसाला मंत्री बनता येत नाही असे कायद्यात कुठेही नाही. सतीश नाइक निरुत्तर झाले. वागळे यांनी त्यांना परत काही बोलूच दिले नाही.

शनिवार, २४ मे, २०१४

राजकारणात कोणीही कायमचा शत्रु नसतो


काल लालू यादव अणि नितीश कुमार यांनी बिहार मधे युती केली. बिहार मधल्या राजकारणातिल हे दोघे कट्टर शत्रु. तरीही नरेन्द्र मोदींच्या भाजप विरोधात ते एकत्र आले. लोकांना सांगण्यात (समजण्यात) आले की भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. परंतु त्यांनी मुख्यमंत्री केले ते एका SC माणसाला. ते यासाठी की SC लोकांनी त्यांना मते द्यावीत. आता तुम्हीच सांगा जातीयवादी कोण ? ह्या लोकांना हे कळत नाही की लोक आता हुशार झाले आहेत. पब्लिक सब जानती है । भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ब्लॉग वर लिहलेय ते अगदी खरे आहे. ते म्हणतात ' बुद्धिवंत माद्ध्यमांइतके लोक बुद्धू नसतात'