दि. 25 मे, 2014
आयबीएन लोकमत वर आजचा सवाल होता 'सार्क देशातील प्रमुखांना शपथ -विधिला बोलवून नरेन्द्र मोदिंनी नविन पायंडा पाडलाय काय?'. होय 96% नाही 4%. खरे म्हणजे असा प्रश्न विचारलाय की हो म्हणण्या शिवाय काही पर्यायच ठेवलेला नाही. कारण आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी सार्क देशातील पंतप्रधानांना शपथविधी समारंभाला बोलवलेले नाही. मग उत्तर होयच येइल ना ?
उत्तर जर हो आले तर वागळे खुश होतात. असं एकच उदहारण नाही तर असंख्य आहेत. ही वागले की दुनिया आहे, तर असो.
नमोंनी करझाई (अफगानिस्तान), नवाब शरीफ (पाकिस्तान), शेख हाशिना (बांग्लादेश), राजपक्षे (श्रीलंका), भुतान, मालदीव अणि नेपाळ यांच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधान या सर्वांना शपथविधी समारंभाला बोलाविले आहे.
या पैकी फक्त शरीफ अणि राजपक्षे यांना बोलवले म्हणून तंटा उदभवाला आहे. कांग्रेस म्हणते शरीफ यांना बोलवायला नको होते. भाजप पाकिस्तानच्या विरोधी एव्हड़े बोलतो मग शरिफला का आमंत्रण दिले. चर्चेमधे असेही कळले की लश्कर-ए-तैयब्बा ने शरिफना धमकी दिली आहे की भारतात शपथविधिला गेलात तर खबरदार ! जाणार असाल तर एकच तिकीट काढून जा. परत येण्याचे काढू नका. म्हणजे भारतातच रहा. कॉंग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले जर शरीफ स्वत: नाही आले अणि त्यांनी कोणा प्रतिनिधिला पाठविले तर भारताची संपूर्ण जगात नाचक्की होईल.
काय हे कांग्रेसचे प्रवक्ते. शरिफला नसते बोलाविले तरी बोंबाबोंब अणि बोलाविले तरी बोंबाबोंब. आता हे आशेच पाच वर्षे चालणार आहे.
दुसरे वादग्रस्त व्यक्ति म्हणजे राजपक्षे. त्यांना विरोध आहे जयललिता अणि करूणानिधि यांच्या पक्षांचा. राजपक्षे यांनी श्रीलंकेत तमिळि लोकांची कत्तल केली असे ते म्हणतात. नशीब चांगले की भाजपला बहुमत मिळाले. जरका सरकार बनवण्यासाठी कोणाचा आधार घ्यावा लागला असता तर काही खरे नव्हते.
आजची आणखी नविन बातमी. भाजपने जसा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदींना आधीच जाहिर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आधी राजसाहेब यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहिर करावा. म्हणजे मनसेचे फुटलेले मतदार पुन्हा येतील. राजकारणात काहीही होऊ शकते याचा ढळढळित पुरवा उद्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा